विट्यात अपायकारक औषधाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

शारिरिक क्षमता वाढवण्यासाठी औषधांचा वापर
The police have arrested those who spread the drugs.
नशेली औषधांचा प्रसार करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Pudhari Photo

विटा : पुढारी वृत्तसेवा

शरीराला अपायकारक औषधाची विक्री केली म्हणून विटा पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. दिलीप बाबुराव ठोंबरे (वय ४८ रा.नेहरु नगर विटा), सुशांत हिंदुराव जाधव (वय २७ रा.पुणदी रोड तासगांव) आणि अमरदिप राम चंद्र भंडारे, (रा.कार्वे ता.खानापूर) अशी त्यांची नावे असून याबाबत हवालदार दिग्विजय शिवलींग कराळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत विटाचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले की, विटा शहरात नवयुवक आणि विशेषतः कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर पिळदार बनविण्यासाठी या औषधाच्या इंजेक्शनचा वापर करून नशा करीत असल्याच्या तक्रारी विटा पोलीस ठाण्याकडे आल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही तपास सुरू केला असता विटा पोलीस ठाण्याचे हवालदार उत्तम माळी यांना शनिवारी (दि.13) रात्री दिलीप ठोंबरे औषध विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे सुशांत जाधव आणि अमरदीप भंडारे हे अन्य दोन साथीदारही असल्याचे समोर आले आहे.

The police have arrested those who spread the drugs.
नागभीड तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरला अटक

या तिघांच्याकडून औषधाच्या १६ सिलबंद बाटल्या, दरम्यान, या इंजेक्शनच्या बाटल्या त्यांनी कोठून खरेदी केल्या आहेत त्याच्या मुळापर्यत जाऊन आम्ही सखोल तपास करीत आहोत. मेफेनटरमाइन सल्फेट हे औषध हे रक्तदाब कमी होण्याच्या उपचारात वापरले जाते. हे रासायनिक संदेशवाहक (एड्रेनालाईन) सोडण्यास मदत करते, जे रक्तवाहिन्या संकुचित करते. हे अधिक रक्त पंप करण्याच्या हृदयाच्या संकुचित क्षमतेला देखील प्रोत्साहन देते. त्यामुळे ते तुमचे रक्तदाब वाढवण्याचे काम करते. मात्र त्यामुळे शरीरात उच्च रक्तदाब, चिंता, निद्रानाश आणि अति उत्तेजित होणे या सारखी तात्पुरती नशा येते. परंतु तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच हे औषध घेतले जाते अन्यथा त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका येणे तसेच मेंदू चे कार्य बंद पडणे असे दुष्परिणाम ही होऊ शकतात. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news