

मिरज : मिरजेतील बोकड चौक येथे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाल्याने मोठा राडा झाला. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर अल्पसंख्याक समाजातील तरुणांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी दोन्ही समाजांमध्ये मध्यस्थी करून दोघांनाही पिटाळून लावले.
यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे दोन्ही गटांची पोलिसांनी समजूत काढून त्यांना पिटाळून लावले. यावेळी दगडफेकीचादेखील प्रकार घडल्याचे सांगण्यात आले; परंतु याला पोलिसांनी मात्र दुजोरा दिलेला नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.