Sangli Accident: तासगाव-मणेराजुरी महामार्गावर दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू

तासगाव-मणेराजुरी या राष्ट्रीय महामार्गावर पायी चालत निघालेल्या वृद्धाला दुचाकीने पाठीमागून धडक दिली
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

तासगाव : तासगाव-मणेराजुरी या राष्ट्रीय महामार्गावर पायी चालत निघालेल्या वृद्धाला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. अपघातात शंकरराव मारुतीराव साळुंखे (वय 80, रा. वासुंबे, मूळ रा. जुळेवाडी, ता. कराड ) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा धैर्यशील साळुंखे (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.

शंकरराव साळुंखे हे तासगाव मणेराजुरी रस्त्यावर सायंकाळी फिरावयास गेले होते. ते घरी परतत असताना एका शीतगृहासमोर पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेने ते जोराने रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीसह पसार झाला. तासगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news