Sangli Murder Case: राजस्थानी ठेकेदारच्या खूनप्रकरणी संशयितास गोव्यातून अटक

पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून करून पसार झालेल्या प्रेमकुमार पवनकुमार बरालाया संशयिताला संजयनगर पोलिसांनी गोव्यातून अटक केली
Crime News
Murder Case Pudhari
Published on
Updated on

सांगली : पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून करून पसार झालेल्या प्रेमकुमार पवनकुमार बराला (वय 21, रा. जेतूसरा, ता. श्रीमाधवपूर, जि. सिकर, राजस्थान) या संशयिताला संजयनगर पोलिसांनी गोव्यातून अटक केली. गेल्या पाच दिवसापासून तो फरार होता.

प्रेमकुमार बराला याने राजस्थानमध्ये वास्तव्यास असताना एका तरुणीशी प्रेमप्रकरण जुळल्यानंतर तिच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर कामधंदा करण्यासाठी तो सांगलीत राहणारा फरशी ठेकेदार गोपालसिंह बेगाराम भदाला याच्याकडे आला होता. गोपालसिंहच्या शेजारीच त्याने भाड्याने खोली घेतली. गोपालसिंह हा प्रेमकुमारच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत होता. प्रेमकुमार घरी नसताना त्याने तिची छेड काढली होती. तिने हा प्रकार प्रेमकुमारला सांगितला.

या रागातून दि. 27 फेब्रुवारीरोजी दुपारी चारच्या सुमारास प्रेमकुमारने खोऱ्याच्या प्लास्टिकच्या दांड्याने हल्ला करून गोपालसिंहचा खून केला. त्यानंतर तो पत्नीसह सांगलीतून पसार झाला. संजयनगर पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर प्रेमकुमारच्या शोधासाठी तातडीने एक पथक राजस्थानकडे रवाना करण्यात आले, तसेच एक पथक स्थानिक परिसरात माग काढत होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

तांत्रिक तपासातून मिरज बसस्थानकापर्यंत त्याचा शेवटचा ठावठिकाणा समजला. त्यानंतर त्याचा माग काढणे कठीण बनले होते. मात्र संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे त्यास गोव्यातून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news