Sangli News| दुष्काळी परिस्थितीने साखर कारखानदारी अडचणीत

डॉ. सुरेश भोसले; कृष्णा कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन
Sugar Industry
शिवनगर : कृष्णा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाप्रसंगी बॉयलर अग्निप्रदीपन करताना कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी उत्तरा भोसले. शेजारी विनायक भोसले, सी. एन. देशपांडे आदी.
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारी अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. यंदा दुष्काळाचे सावट आणि उसाच्या टंचाईमुळे राज्यभरातील अनेक कारखाने ६० ते ९० दिवस चालण्याची शक्यता आहे. मात्र, अशा आव्हानात्मक परिस्थितीतही सभासद, कामगार आणि 'कृष्णा' परिवाराला सोबत घेऊन शिस्त व पारदर्शक कारभाराच्या बळावर कारखाना यशाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गाळप हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. सुरेश भोसले व उत्तरा भोसले यांच्याहस्ते बॉयलरचे पूजन करून अग्निप्रदीपन करण्यात आले.

व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. या सोहळ्यास कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कराड पंचायत समितीच्या सभापती नंदा यादव, जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, प्रदीप पाटील, शिवाजी पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news