

विटा : कृष्णा महापूर उपाय योजनांतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून खानापूर विधानसभा मतदार संघातील तब्बल 33 नवीन साठवण तलावांसाठी निधी मिळावा, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खानापूर मतदारसंघातील नवीन साठवण तलाव, रुपांतरीत साठवण तलाव, पाझर तलाव पुनर्स्थापना कामासाठी निधी मिळावा. यांत खानापूर तालुक्यातील रामनगर रुपांतरीत साठवण तलाव, वाळूज रुपांतरीत साठवण तलाव, आटपाडी तालुक्यातील खरसुंडी - रुपांतरीत साठवण तलाव, पिसेवाडी रुपांतरीत साठवण तलाव, भूड क्र. 4 रुपांतरीत साठवण तलाव, लेंगरे (मणेर) पाझर तलाव दुरुस्ती, भिंगेवाडी साठवण तलाव तसेच ढवळेश्वर पाझर तलाव दुरुस्ती, सुळेवाडी क्र. 1 पाझर तलाव दुरुस्ती, खानापूर (स्वामीचा) पाझर तलाव दुरुस्ती, सुळेवाडी क्र. 3 पाझर तलाव दुरुस्ती, भूड (भावपणी खोरा) पाझर तलाव दुरुस्ती, भूड (डुकरदरा) रुपांतरीत साठवण तलाव, घाडगेवाडी रुपांतरीत साठवण तलाव, घोटी खुर्द रुपांतरीत साठवण तलाव, पोसेवाडी रुपांतरीत साठवण तलाव, खंबाळे खामजाई रुपांतरीत साठवण तलाव, चिंचणी-काटेओढा रुपांतरीत साठवण तलाव, शेटफळे बाबरशेत रुपांतरीत साठवण तलाव, पिंपरी खु. क्र 1 साठवण तलाव, काळेवाडी रुपांतरीत साठवण गाव तलाव, चिंचाळे क्र 2 रुपांतरीत साठवण तलाव, बाळेवाडी साठवण तलाव, मिटकी साठवण तलाव, कोठुळी साठवण तलाव, आंबेवाडी साठवण तलाव, पुजारवाडी (आ.) साठवण तलाव, आवळाई (वाघदरा) साठवण तलाव, तळेवाडी (तरकरवाडी व शिदोबा तलाव), वलवण क्र. 1 साठवण तलाव, पुजारवाडी (दि.) शिदोबा साठवण तलाव, धामणी भटकी साठवण तलाव (ता. तासगाव), घरनिकी दांईगडे साठवण तलाव या कामांसाठी निधी उपलब्ध करावा, अशी लेखी मागणी केल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले.
आमदार सुहास बाबर म्हणाले, महापुरावर उपाय योजना आणि पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने नवीन साठवण तलाव व लघु पाटबंधारे प्रकल्पाचे खोलीकरण आदी कामे प्रस्तावित आहेत. खानापूर मतदारसंघात टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात नवीन साठवण तलावाची कामे झाल्यास पुराच्या काळात टेंभू योजनेच्या माध्यमातून नवीन पाणीसाठा करता येईल. मतदारसंघाची दुष्काळी स्थिती कमी होईल.