सांगली विधानसभा मतदारसंघात सांगली शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ हेच आघाडीवर राहिले. सांगली, सांगलीवाडी, कुपवाड, वानलेसवाडी आमदार गाडगीळ यांच्या पाठीशी राहिली आहे. चौदापैकी अकरा गावे आणि पोस्टल मतात गाडगीळ यांनीच बाजी मारली आहे. कावजी खोतवाडी व वाजेगाव या गावांत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, तर पद्माळे गावात काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना आघाडी मिळाली आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांना 1 लाख 12 हजार 498 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना 76 हजार 363 मते, तर काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना 32 हजार 736 मते मिळाली. आमदार गाडगीळ हे 36 हजार 135 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. शहरी व ग्रामीण भागात गाडगीळ यांना आघाडी मिळाली.
खणभाग, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मथुबाई गरवारे कॉलेज, पोलिस लाईन राजवाडा चौक, काँग्रेस कमिटी जिमखाना हॉल, पंचमुखी मारुती रस्ता, धनगरगल्ली, केसीसी शाळा मिशन कंपाऊंड परिसरातील केंद्रांवर सुधीर गाडगीळ यांना 8 हजार 713, पृथ्वीराज पाटील यांना 8 हजार 528, जयश्री पाटील यांना 2 हजार 28 मते मिळाली.
सांगलीत शांतिनिकेतन, पंचशीलनगर, संजयनगर परिसरात आमदार गाडगीळ यांना 10 हजार 938 मते, पृथ्वीराज पाटील यांना 6 हजार 141 मते, जयश्री पाटील यांना 4 हजार 205 मते मिळाली. कस्तुरबाई वालचंद कॉलेज, शिंदे मळा, हडको कॉलनी समर्थनगर, लक्ष्मी मंदिर, मनपा उर्दू शाळा नंबर 45, सह्याद्रीनगर, जलभवन मार्केट यार्ड, पोलिस जिमखाना हॉल, सावरकर प्रशाला, नेमिनाथनगर, गुलमोहर कॉलनी, विठ्ठलनगर शंभरफुटी, इंदिरानगर झोपडपट्टी, रामनगर पहिली गल्ली, तिरमारे गुरुजी शाळा परिसरात गाडगीळ यांना 16 हजार 730 मते, पृथ्वीराज पाटील यांना 8 हजार 405 मते, तर जयश्री पाटील यांना 3259 मते मिळाली.
बापट बालमंदिर, सिटी हायस्कूल, मनपा शाळा नंबर 5, पेठभाग, शहर पोलिस चौकी, राणी सरस्वती कन्या शाळा, कर्नाळ रोड पसायदान शाळा, जामवाडी, गुजराथी विद्यालय, वखारभाग, रतनशीनगर, दडगे हायस्कूल, स्वरूप टॉकीज, दामाणी हायस्कूल, त्रिकोणी बाग, सिव्हिल रोड, गणेशनगर, मनपा शाळा नंबर 6, पाकीजा मशीद शंभर फुटी, खिलारे मंगल कार्यालय, शामरावनगर, झुलेलाल चौक परिसरात सुधीर गाडगीळ यांना 21 हजार 32, पृथ्वीराज पाटील यांना 16 हजार 446, जयश्री पाटील यांना 4 हजार 581 मते मिळाली.
मातंग समाजमंदिर शाळा नंबर 27, हरभट रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, वेलणकर शाळा, वडर कॉलनी परिसरात सुधीर गाडगीळ यांना 4 हजार 439, पृथ्वीराज पाटील यांना 1 हजार 110, जयश्री पाटील यांना 702 मते मिळाली.
सांगली मतदारसंघात सांगली शहर, सांगलीवाडी, कुपवाड, वानलेसवाडी या शहरी भागासह 14 गावांचा समावेश आहे. नांद्रे, नावरसवाडी, कावजी खोतवाडी, वाजेगाव, बिसूर, कर्नाळ, बुधगाव, बामणोली, माधवनगर, पद्माळे, हरिपूर, अंकली, इनामधामणी, जुनी धामणी या गावांचा समावेश आहे. या चौदा गावांत सुधीर गाडगीळ यांना 22 हजार 585, पृथ्वीराज पाटील यांना 13 हजार 989, तर जयश्री पाटील यांना 10 हजार 278 मते मिळाली.
सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांना मिळालेली मते... अनुक्रमे : नांद्रे- 3509, 1845, 1264. नावरसवाडी- 146, 116, 101. कावजी खोतवाडी- 281, 520, 216. वाजेगाव- 56, 107, 26. बिसूर- 1373, 1138, 898. कर्नाळ- 1709, 1290, 924. बुधगाव- 3783, 2275, 2135. बामणोली- 2315, 987, 454. माधवनगर- 3313, 1900, 1050. पद्माळे- 429, 348, 1070. हरिपूर- 2716, 1558, 1021. अंकली- 1304, 710, 269. इनाम धामणी- 1275, 976, 718. जुनी धामणी- 376, 222, 132.