महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता मंजूर

आयुक्त गुप्ता : रोजगार, स्वयंरोजगारासाठी साहाय्य करणार
Subsistence allowance for disabled persons approved in Mahapalika area
आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अ‍ॅड. स्वाती शिंदे यांच्यासमवेत दिव्यांग बांधव.Pudhari Photo

सांगली : महापालिका क्षेत्रातील 1886 दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता मंजूर केला आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 5 टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी वापरला जाणार आहे. दिव्यांगांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी साहाय्य करणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी दिव्यांग बांधवांसोबत आयुक्त गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे यांची भेट घेतली. उर्मिला बेलवलकर, स्मिता पवार, जग्गू शेख, शफिक खलिफा, इंजमाम सय्यद, सुरेश भंडारे, राहुल बेळगी, ऋतुजा कोटला, अभिजित वेल्हाळ, राम वडर, मनोज खिलारे यांच्यासह दिव्यांग उपस्थित होते.

दिव्यांगांना दरमहा 3 हजार रुपये याप्रमाणे उदरनिर्वाह भत्त्यासाठी तरतूद आहे. वर्षातील दोन टप्प्यात ही रक्कम दिली जाते. पहिल्या टप्प्यात 1420 दिव्यांगांना प्रत्येकी दरमहा 1500 रुपये याप्रमाणे उदरनिर्वाह भत्ता मिळालेला आहे. त्यांना उर्वरित 1500 रुपये दरमहा याप्रमाणे भत्ता मार्चमध्ये मिळणे आवश्यक होते.

Subsistence allowance for disabled persons approved in Mahapalika area
दिव्यांग, लहान मुले, महिला, कामगारांची काळजी घ्या; आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news