

सांगली : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. सध्या जातीयवादी प्रवृत्ती महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली करीत आहेत. त्यांना वेळीच रोखून देश मजबूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले. सांगली काँग्रेस समितीच्या वतीने बुधवारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ. नामदेव कस्तुरे, प्रकाश जगताप, बिपीन कदम, अल्ताफ पेंढारी, मालन मोहिते उपस्थित होते. यावेळी डॉ. नामदेव कस्तुरे यांनी मार्गदर्शन केले.
सकाळी येथील स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आमदार डॉ. सावंत व स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीचे अशोक मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. पैगंबर शेख यांनी स्वागत केले. अजित ढोले यांनी प्रास्ताविक केले. मौलाली वंटमुरे यांनी आभार मानले. यावेळी गुलाबराव भोसले, पृथ्वीराज पाटील, अनिल मोहिते, महावीर पाटील, डी. पी. बनसोडे, राजेंद्र कांबळे, याकूब मणेर, सुनील भिसे, शिवाजी सावंत, संभाजी पाटील बेडग, प्रतीक्षा काळे, कांचन खंदारे, शमशाद नायकवडी, नामदेव पठाडे, डॉ. अमित बसण्णावर, वसंत जाधव, गणेश वाघमारे उपस्थित होते.