

विटा : चार महिन्यांपूर्वी विट्याच्या बस स्थानकावर बसमध्ये चढताना चोरलेले 1 लाख 29 हजाराचे सोन्याचे दागिने न्यायाधीशांच्या आदेशाने संबंधित जयश्री उदय जगताप (किल्लेमच्छिंद्र, ता. वाळवा) या महिलेला परत दिल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. चार महिन्यांपूर्वी 30 जानेवारीरोजी जगताप यांची पर्स चोरी झाली.
याबाबत त्यांनी विटा पोलिसांत दिली होती. तपास करत असताना ही चोरी चमेली दौलुशा पवार (वय 38, आटपाडी ), प्रिया रवींद्र काळे (30, हजापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आज गुरुवारी न्यायाधीशांच्या आदेशानुसार जगताप यांना त्यांचे दागिने परत केले. तपास पोलिस उत्तम माळी यांनी केला.