Sangli News : एसटीमधील वायफाय सेवा बंद

करार संपला ः गाशा गुंडाळल्याने कोट्यवधींचे नुकसान
Sangli News
एसटीमधील वायफाय सेवा बंद
Published on
Updated on

शिराळा शहर : एसटी बसच्या प्रवासात मनोरंजन व्हावे म्हणून प्रवाशांच्या सेवेसाठी 2016-17 मध्ये प्रत्येक बसमध्ये मोफत वायफाय देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती. परंतु, करार संपल्याने पाच वर्षातच ही सेवा बंद पडल्याने मोफत वायफायचा गाशा गुंडाळला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया गेली आहे.

राज्यातील अठरा हजार बसेसमध्ये मोफत वायफाय लावण्यात आले होते. यासाठी दरवर्षी अतिरिक्त एक कोटीचा भार महामंडळाने घेतला. वायफाय लावल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. प्रवासामध्ये वायफाय कनेक्ट केल्यानंतर प्रवाशांचे मोफत मनोरंजन होऊ लागले. त्यामुळे एसटीचा प्रवास सुखद वाटू लागला होता. परंतु सन 2017 मध्ये एका कंपनीसोबत वायफायचा केलेला पाच वर्षांचा करार संपल्याने मोफत वायफायची सुविधा बंद असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली वायफाय सेवा काही वर्षांपासून बंद असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत.

एसटी महामंडळाच्या विविध सुविधा प्रवाशांसाठी असल्याने महामंडळ बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली होती. परंतु बसमध्ये मनोरंजन व्हावे यासाठी लावण्यात आलेले मोफत वायफाय बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होत असून, सुविधा पुन्हा सुरू करण्यात यावी.
अविनाश खोत, मनसे तालुका प्रमुख, शिराळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news