Sangli Accident : सांगलीत भरधाव कारने तीन वाहनांना उडवले

अपघातग्रस्त कारचा चालक जखमी
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

सांगली : येथील सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर असलेल्या सुखरूप लॉजसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन वाहनांचे गंभीर नुकसान झाले असून कारचालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​संतोष मल्लापा पैलद (वय ३२, रा. बागलकोट, कर्नाटक) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैलद हे आपला टेम्पो (एम.पी. ४३ झेड.एच. ७५४९) घेऊन बागलकोटहून पुण्याकडे जात होते. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील झुलेलाल चौकाकडून सुखरूप लॉजसमोर ते आले असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव लाल रंगाच्या कारने (एम.एच. ०९ डी.ए. ९९९४) त्यांच्या वाहनाला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. ​ या धडकेनंतर कारने पुढे जाऊन रस्त्याकडेला उभ्या असलेला रिक्षाला (एम.एच. १० एस.एस. १९७५) आणि आणखी एका कारला (एम.एच. ४८ सी.टी. ३३५९) भीषण धडक दिली. या विचित्र अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघातग्रस्त कारचा चालक जखमी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news