Lightning strike : सोन्याळ उपकेंद्रावर पडली वीज

मुख्य ट्रान्स्फॉर्मर जळाला; जनजीवन विस्कळीत; सहा गावे अंधारात
Lightning strike
वीज कोसळलीFile photo
Published on
Updated on

जत शहर : जत तालुक्यातील सोन्याळ येथील 33/11 के.व्ही. विद्युत उपकेंद्रावर वीज कोसळल्याने मुख्य पॉवर ट्रान्स्फॉर्मर जळाला. यामुळे सोन्याळ, लकडेवाडी, जाडरबोबलाद, व्हसपेठ, माडग्याळ, कुलाळवाडी, उटगी आणि अंकलगी या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्या व शेतातील घरे गेल्या तीन दिवसापासून अंधारात आहेत. तत्काळ दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना विजांचा कडकडाट झाला. सोन्याळ येथील उपकेंद्रावर वीज कोसळली. यामुळे मुख्य ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाला. घटनेनंतर या उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. गावठाणातील काही भाग वगळता बहुतेक वाड्या-वस्त्या आणि शेतातील घरे अंधारात गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पिण्याचे पाणी, शेतीची कामे, जनावरांची देखभाल तसेच घरगुती कामांवर मोठा परिणाम झाला आहे.

नवीन ट्रान्सफार्मरचे काम सुरू

महावितरणने पर्यायी व्यवस्था म्हणून भगीरथ योजनेच्या ट्रान्स्फॉर्मरवरून तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला आहे. मात्र या माध्यमातून दिवसातून केवळ चार तासच वीज उपलब्ध होत आहे. त्यामध्येही अनियमितता असून, शेतकऱ्यांना पाणीपुरवठा, मोटारी चालवणे, तसेच घरगुती कामे पूर्ण करणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, मिरज-सांगली येथून पथक बोलावण्यात आले असून नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती माडग्याळ शाखा कार्यालयाचे अभियंता प्रमोद माडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news