सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील चार हजार 714 घरांत ‘सौरप्रकाश’

आणखी 875 प्रकल्प पूर्णत्वाकडे : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेला 32 हजार ग्राहकांचा प्रतिसाद
Sangli News
सौरउर्जा प्रकल्पPudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : मोहन यादव

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत 31 हजार 904 घरगुती वीजग्राहक सहभागी झाले आहेत. त्यातील 4 हजार 714 ग्राहकांकडे 19.3 मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. आणखी 875 प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे आहे. तसेच उर्वरित मंजूर 26 हजार 315 प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत.

Sangli News
Chhatrapati Sambhajinagar : प्रस्तावित सौरउर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी मच्छीमारांच आमरण उपोषण

घराच्या छतावरील 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची सूचना सरकारने केली आहे. या प्रकल्पांसाठी सौर नेटमीटर महावितरणकडून देण्यात येत आहे. 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे.

मागील सहा महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यात 55.2 मेगावॅटसाठी 14,561 ग्राहकांनी तसेच सातारा जिल्ह्यात 8.5 मेगावॅटसाठी 3280, सोलापूर जिल्ह्यात 14.6 मेगावॅटसाठी 4806, कोल्हापूर जिल्ह्यात 17 मेगावॅटसाठी 5492 आणि सांगली जिल्ह्यात 10.5 मेगावॅटसाठी 3765, असे पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत 31 हजार 904 घरगुती ग्राहकांनी 106 मेगावॅट क्षमतेच्या छतावरील प्रकल्पांसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 8.5 मेगावॅटचे 1669, सातारा जिल्ह्यात 1.6 मेगावॅटचे 505, सोलापूर जिल्ह्यात 3.1 मेगावॅटचे 840, कोल्हापूर जिल्ह्यात 4.6 मेगावॅटचे 1272 आणि सांगली जिल्ह्यात 1.5 मेगावॅटचे 428 घराच्या छतावरील सौरप्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

Sangli News
देशातील मोठा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण
या प्रकल्पातून सुमारे 25 वर्षे मोफत वीज मिळेल. अनुदानही दिले जात आहे. तसेच गरजेपेक्षा शिल्लक राहिलेली वीज महावितरण विकत घेत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या बिलात समायोजित केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होत आहे. घरगुती ग्राहक व गृहनिर्माण संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- भुजंग खंदारे, पुणे प्रादेशिक संचालक, महावितरण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news