Sindhudurg News : गणनापत्रांचे वाटप व ऑनलाईन संगणकीकरण वेळेत पूर्ण करा

कणकवलीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
Trupti Dhodmise
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
Published on
Updated on

कणकवलीः भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या गणनापत्र वाटप व ऑनलाईन संगणकीकरण मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवारी कणकवली तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. ही कामे वेळेत पूर्ण करणेचे निर्देश त्‍यांनी दिले.

या बैठकीत कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यतील सद्यस्थितीचा आढाव घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व त्यांच्या पर्यवेक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गणनापत्रांचे शंभर टक्के वाटप विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या गणनापत्रांचे अचूक व वेळेत ऑनलाईन संगणकीकरण करून संपूर्ण प्रक्रिया नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संबंधित पर्यवेक्षकांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. तांत्रिक अडचणींशिवाय कामात दिरंगाई करणाऱ्या अथवा असहकार्य करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध आवश्यक त्या प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार निलंबनाचा प्रस्तावही सादर करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी तृप्त‍ी धोडमिसे यांनी दिला.

बैठकीस मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार दिक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच पर्यवेक्षक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news