Shirala ZP Election : आधी लगीन लोकशाहीचे...

मतदान करून वधू-वर चढले बोहल्यावर...
Shirala ZP Election
जांभळेवाडी आणि नाटोली येथील वधू-वर आशिष व प्रतीक्षा मतदान करून मंगल कार्यालयात पोहोचले.
Published on
Updated on

शिराळा शहर : आधी लगीन कोंढाण्याचे... या छत्रपती शिवरायांचा वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कर्तव्यनिष्ठेप्रमाणेच शिराळा परिसरातील जांभळेवाडी येथील आशिष भरत ढेबे आणि नाटोली येथील प्रतीक्षा बापू कापूरकर या वर-वधूने लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाहीप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली.

लग्नसोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. काहींनी मतदानादिवशीच लग्नसोहळा आयोजित केला होता, तर काहींनी दोन महिन्यांपूर्वीच ही तारीख ठरविली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दिवस खास ठरला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शनिवारी (दि. 7) झाल्या. या दिवशी अनेकांनी आपल्या लग्नाचे नियोजन आखले होते. त्यामुळे त्यांना पहिले मतदान करून, त्यानंतर लग्नसमारंभासाठी पोहोचावे लागले. जांभळेवाडी आणि नाटोली येथील वधू-वराने आपल्या लग्नादिवशीच आपले कर्तव्य पार पाडले. वर-वधूंसाठी हा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news