flower farming : शिराळा तालुक्यात फुलांची शेती धोक्यात

ऐन उन्हाळ्यात पाण्याची कमतरता... लग्नसराईत जाणवतोय फुलांचा तुटवडा
flower farming
flower farming
Published on
Updated on

शिराळा शहर : तालुक्यात मार्चमध्येच उन्हाचा तडाखा वाढला असल्याने सुगंध देणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. पाण्याची कमतरता भासत असल्याने फूलबागा संकटात आहेत. फुले करपू लागली आहेत. शहर बाजारात फुलांचे दर वाढलेले आहेत. मोगऱ्याने भाव खाल्ला असून तो हजारच्या घरात गेला आहे.

सध्या सणांचा काळ सुरू असून लग्नसराईही आहे. परंतु फुलांची आवक या काळात कमीच असल्याने अस्सल फुलांच्या जागी काही प्रमाणात प्लास्टिकच्या हारांनी ही कसर भरून काढली आहे. शिराळा तालुक्यात खेड, रेड, इंग्रुळ, कापरी या भागात जास्त फुलांची शेती केली जाते. ऐन लग्नसराईत फुलांच्या किमती वाढल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. गुलाब आणि इतर फुलांच्या दरातही वाढ झाली आहे.

प्लास्टिक फुलेही हुबेहूब...

अनेक ठिकाणी अस्सल फुलांची जागा प्लास्टिक फुलांनी घेतली आहे. अनेक वर्षांपासून फुलांच्या हारांची जागा पुदिन्याच्या हाराने घेतली आहे. फुलांच्या पाकळ्या गळत असल्याने त्याजागी पुदिन्याचे आकर्षक व मोठ्या आकारातील हार शहरात बनवले जात आहेत.

कच्चा माल महागल्याचा परिणाम तयार मालावर नक्कीच होत आहे. साधा बुके 100 रुपयांपासून, तर गोल हार 50 रुपयांना एक नग मिळत आहे. उन्हाळ्यामुळे अजूनही दोन महिने फुलांचे दर वाढते राहतील.
- विनायक माळी फुलांचे उत्पादक, खेड (ता. शिराळा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news