

शिराळा : भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने शिराळा तालुक्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत तालुक्यात आतापर्यंत एकूण ७३ वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला लोकसहभागाची जोड देत शिराळा तालुक्यात जलसंधारणाची चळवळ आकार घेत आहे. लोकसहभाग, श्रमदान आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ७३ वनराई बंधारे हे पाणी संवर्धनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी आणि जलसुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक गावाने अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.