Sangli News : डीजे, बीभत्स नृत्यामुळे संस्कृतीची पायमल्ली

शिराळ्यातील महिला आक्रमक; परंपरेचे रक्षण करण्याची मागणी
Sangli News
शिराळा : नागपंचमीवेळी झालेल्या बीभत्स नृत्याचा महिलांच्या बैठकीत निषेध करण्यात आला.
Published on
Updated on

शिराळा : नागपंचमी उत्सवाला लाभलेली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम राखताना, डीजे तसेच अश्लील व बीभत्स नृत्यप्रकारांना तातडीने आळा घालावा, अशी जोरदार मागणी करत शिराळ्यातील महिलांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 'नागपंचमीचे गाव' म्हणून ओळख सांगताना अशा अश्लील प्रकारांमुळे मान खाली घालावी लागते, अशा शब्दांत महिलांनी आपली खंत व्यक्त केली.

येथील दत्त मंदिर हॉलमध्ये 'जय जिजाऊ महिला नागराज मंडळा'च्यावतीने आयोजित बैठकीत महिलांनी ही आक्रमक भूमिका मांडली. याप्रसंगी अश्विनी कदम, नेहा सूर्यवंशी, सुनंदा सोनटक्के, जिल्हा परिषद सदस्या राजेश्वरी नाईक, अनिता धस, वैशाली नाईक, डॉ. कृष्णा जाधव, नम्रता नाईक, सीमा पाटील, सीमा कदम, सुरेखा गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वसंतराव यादव, सर्जेराव गायकवाड, नगरसेवक महेश खंडागळे, प्रा. ॲड. सम्राट शिंदे, डॉ. नितीन जाधव यांनीही महिलांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

बैठकीत महिला म्हणाल्या, "आतापर्यंत डीजेचा कर्णकर्कश आवाज सहन केला; मात्र यावर्षी झालेले बीभत्स प्रकार यापुढे सहन करणार नाही. डीजेच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन-दोन दिवस घर सोडून बाहेर जावे लागते, तर लहान मुलांवर चुकीचे संस्कार होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news