

मिरज : खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा पिस्तूल बाळगणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणार्या एजाज अल्फाज शेख (वय 24) आणि मलिकजान ऊर्फ सुहेल राजू नदाफ (वय 23, दोघे रा. मिरज) या दोघांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी : एजाज शेख व त्याचा साथीदार मलिकजान नदाफ या दोघांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा पिस्तूल बाळगणे, घातक हत्यारे बाळगणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे मिरज पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दोघांना हद्दपार करण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव दाखल केला होता. यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सलग सुनावणी घेतली. त्यानंतर दोघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.