

नेवरी : शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत शासनाची नियमावली कागदावरच राहिली आहे. याबाबत शाळांच्या व्यवस्थापकाकडून कोणतीच कारवाई होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना शारीरिक व्याधीना सामोरे जावे लागत आहे.
शिक्षण विभागानेच याबाबत कडक कारवाईची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. राज्य शासनाने केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामध्ये दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना मानदुखी, पाठदुखी आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे आढळून आले होते. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.