महापालिकेच्या कचरा डेपोवर ‘स्काडा’ यंत्रणा

आयुक्त सत्यम गांधी : कचर्‍याची वाहतूक, वजनात येणार पारदर्शकता
SCADA system waste management
सांगली महानगरपालिकाpudhari photo
Published on
Updated on

सांगली : महापालिकेच्या समडोळी व बेडग रोडवरील कचरा डेपोवर अत्याधुनिक ‘स्काडा’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे डेपोवर येणारी कचर्‍याची वाहने, त्यांच्या फेर्‍या, कचर्‍याचे वजन यामध्ये पारदर्शकता येणार आहे. मूल्यांकन व उत्तरदायित्व निश्चित करणे सोपे होणार आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांना कार्यालयाबाहेर असतानाही या प्रणालीवर ‘ऑनलाईन’ नजर ठेवत सर्व कामकाज ‘लाईव्ह’ पाहता येणार आहे, अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली.

गांधी म्हणाले, ‘स्काडा’ प्रणालीमुळे कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता येणार आहे. कमी मानवीय हस्तक्षेप असून प्रणाली स्वयंचलित असल्याने चुकीची माहिती देणे, वेळेचा अपव्यय किंवा अकार्यक्षमता यावर नियंत्रण येणार आहे. ही स्मार्ट तंत्रज्ञानाधारित प्रणाली शहरातील कचरा प्रक्रिया आणि वाहतुकीवर रिअल टाइम नियंत्रण व देखरेख ठेवण्यास मदत करणार आहे. ‘स्काडा’ ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे. ती विविध प्रकारच्या सेन्सर्स, कॅमेर्‍यांद्वारे माहिती गोळा करते व ती माहिती नियंत्रण कक्षात पाठवते. यामुळे व्यवस्थापन अधिक वेगाने व अचूकतेने निर्णय घेऊ शकते.

‘स्काडा’ प्रणाली समडोळी रोड आणि बेडग रोड येथील कचरा डेपो येथे सुरू करण्यात आली आहे. ‘स्काडा’ प्रणालीद्वारे मिळणार्‍या आकडेवारीचा वापर करून अधिक योजनाबद्ध आणि कार्यक्षम धोरणे राबवली जातील. दैनंदिन संकलित होणार्‍या कचर्‍यावर खासगी एजन्सीद्वारे प्रक्रिया केली जात आहे. त्यासाठी एजन्सीला रक्कम दिली जाते. ‘स्काडा’ प्रणालीमुळे कचर्‍याचे वजन अचूक होणार आहे, असे गांधी यांनी सांगितले.

‘स्काडा’चे मुख्य कार्य..

स्काडा प्रणालीमुळे रिअल-टाईम डेटा संकलन, रिपोर्टिंग दिवसाअखेरीस किती कचरा संकलित झाला, किती वेळ लागला, किती इंधन वापरले, यावर आधारित अहवाल तयार होतो. दररोज, साप्ताहिक, मासिक कामाचा अहवाल तयार होतो. यामुळे पारदर्शकता येणार आहे.

महापालिकेने ‘स्काडा’ प्रणाली कार्यान्वित करून घनकचरा व्यवस्थापन व शहराच्या स्वच्छतेसाठी स्मार्ट पाऊल टाकले आहे. या प्रणालीतून घनकचरा व्यवस्थापनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. कचरा वाहतूक करणार्‍या वाहनांच्या फेर्‍या, कचर्‍याचे वजन याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news