

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्याच्या विकासासाठी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून मी निवडणूक लढवीत आहे. जनतेने मला लोकसेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांनी केले. हिंगणगाव येथेल निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
संजय पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी सभापती अजित कारंडे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस., कोकळे, करलहट्टी, धुळगाव, विठुरायाचीवाडी, हिंगणगाव, रांजणी गावांमध्ये प्रचार दौरा केला. ते म्हणाले, माजी मंत्री अजितराव घोरपडे व माझ्या प्रयत्नातून म्हैसाळ व टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना पाणी देण्याचे काम केले आहे. भविष्यातही शेतकरी, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समाजकारण आणि राजकारणात काम करणार आहे. सरपंच नंदकुमार पाटील, तात्यासाहेब माळी, नितीन पाटील, सचिन पाटील, उदय शिंदे, नीलेश काटकर, दिलीपराव ओलेकर, सतीश नागणे, सागर ओलेकर, सुनील पवार, विकास भोसले, बंटी भोसले, सचिन भोसले, तुषार पाटील, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.