Sangli Bribe Case : लाच प्रकरणातील शिक्षक निलंबित; सीईओंची कारवाई

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली माहिती
 Crime
Bribe CasePudhari
Published on
Updated on

सांगली ःसरपंच पत्नीच्या सहकार्याने लाच घेणाऱ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक बाळासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ही कारवाई केली. संबंधित शिक्षकाला तालुका मुख्यालयातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.

सरपंच शीतल पाटीलसोबत तिचा पती बाळासाहेब पाटील यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काही दिवसांपूर्वी सापळा रचून पकडले होते. शिराळा तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेलच्या पोर्चमध्ये ही कारवाई झाली होती. याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधववाडी (माधळगाव) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या पाटील याच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. लाच स्वीकारण्यासारखे गंभीर गैरवर्तन केल्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन केल्याचा तसेच प्रशासकीय शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीबाबत निर्णय निलंबन आढावा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news