Sangli News : उशिरा आलेल्या पाच अधिकाऱ्यांना नोटिसा

पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करा ः वेतनासाठीच्या प्रस्तावावर जलद निर्णय घ्या
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत उशिरा उपस्थित राहिलेल्या पाच अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले.

उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती ऋषिकेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक पार पडली. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षणाच्या कामकाजाचा आढावा, शैक्षणिक गुणवत्ता, पोषण आहार योजना आणि विद्यार्थ्यांना गणवेश वितरण यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष यांच्या दालनामध्ये सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वसूचना देऊनही काही अधिकारी उशिरा पोहोचल्याने सभापतींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित पाच अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्याच्या नोटिसा मंगळवारी बजावण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news