Sangli News : वाटेगाव गटात रंगली हायव्होल्टेज काटा लढत

जिल्हा परिषद मतदार संघात वातावरण तापले : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार -भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये थेट सामना
Sangli Zilla Parishad
Sangli Zilla Parishad
Published on
Updated on

वाटेगाव : जिल्हा परिषद मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये होणाऱ्या थेट लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना राज्यस्तरावर कार्यरत असणाऱ्या नेते मंडळींनी सहभाग घेतल्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे. त्यामुळे ही लढत ‌‘हायव्होल्टेज‌’ ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संध्या आनंदराव पाटील आणि भाजपच्या ज्योती अमोल पाटील यांच्यामध्ये रंगतदार लढत होत आहे. जयश्री उथळे या अपक्ष उमेदवार आहेत. वाटेगाव जिल्हा परिषद मतदार संघ संवेदनशील असून राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र बर्डे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, त्याचबरोबर भाजपाचे नेते आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनीही मतदारसंघात कोपरा सभा, बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवार घर टू घर प्रचार करत आहेत. सकाळी सातपासून रात्री उभीरापर्यंत प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या उमेदवाराबरोबरच पंचायत समितीचे उमेदवारही प्रचारात आघाडीवर आहेत. प्रमुख कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक घरापर्यंत, शेताच्या बांधावर जाऊनही मतदारांशी संवाद साधत आहेत. बैठकांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा प्रत्येक उमेदवार मांडत आहेत. पुढच्या काळातही विकास कामासाठी विविध घोषणा करत आहेत. वाटेगाव पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे हेमंत मुळीक यांच्यात होणारी लढत रंगतदार होणार आहे. रिपब्लिकन सेनेच्यावतीने संदीप धुमाळ हेही निवडणूक रिंगणात आहेत. रेठरे धरण पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रेश्मा गुरव आणि भाजपाच्या वर्षा कोळेकर या मतदारांशी थेट संपर्क ठेवून आहेत. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अमोल पाटील, त्यांचे बंधू सुहास पाटील सांभाळत आहेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील सांभाळत आहेत.

बर्डे यांचा भाजपला पािंंठबा

वाटेगाव जिल्हा परिषद मतदार संघात लोकनेते राजारामबापू पाटील आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे समर्थक असलेले सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र बर्डे यांनी या निवडणुकीत वाटेगाव जिल्हा परिषद मतदार संघात भाजपाच्या उमेदवार ज्योती पाटील आणि पंचायत समिती गणातील उमेदवार हेमंत मुळीक यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथे चुरस अधिक वाढली आहे. रवींद्र बर्डे वाटेगाव आणि परिसरात सातत्याने कार्यरत असणारे नेतृत्व आहे. वाटेगावात त्यांच्या या भूमिकेने भारतीय जनता पार्टीला अधिक ताकद मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news