Sangli ZP | सभापतींच्या आज निवडी : भाजपकडूनही रणनीती

विषय समित्यांही ताब्यात ठेवण्यासाठी आघाडीकडून ‌‘प्लॅन‌’
Sangli ZP
Sangli ZPPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड बुधवारी, दि. 18 मार्च रोजी झाली. त्यानंतर आता विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवार, दि. 1 एप्रिलरोजी विषय समिती सभापतींच्या निवडी होणार आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदानंतर आता विषय समित्यांवर ताबा ठेवण्यासाठी आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपनेही अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतील चुका टाळून सभापतीपदे पटकावण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत आघाडीने एकजूट दाखवत बाजी मारली. आता हीच एकजूट सभापती निवडीत कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत चुरस दिसत आहे. मात्र नेत्यांकडून जवळपास नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे नाराज सदस्य भूमिका काय घेणार, याची उत्सुकता आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत ज्या पद्धतीने समन्वय साधला गेला, तोच फॉर्म्युला सभापती निवडीतही वापरला जाणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला दोन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिंदे शिवसेनेला प्रत्येकी एक सभापतीपद देण्याबाबत नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे भाजपकडूनदेखील आघाडीतील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सभापती निवड ही केवळ औपचारिक न राहता चुरशीची होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news