

सांगली ः जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागअंतर्गत कार्यारत असलेल्या सुमारे 132 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तसे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात गुरुवारी 2024-25 मधील 11 संवर्गातील पात्र कर्मचार्यांना बोलवण्यात आले होते. सीईओ धोडमिसे यांच्या उपस्थितीत पदोन्नती प्रक्रिया पार पडली. पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी 1, कनिष्ठ प्रशासन अधिकारी 1, वरिष्ठ सहाय्यक लिपीक 2, कनिष्ठ सहाय्यक लिपीक 6, आरोग्य पर्यवेक्षक 6, आरोग्य सहाय्यक महिला 27, आरोग्य सहाय्यक पुरुष 15, विस्तार अधिकारी शिक्षण 7, केंद्र प्रमुख 12, वरिष्ठ मुख्याध्यापक (कन्नड) 8, वरिष्ठ मुख्याध्यापक मराठी 48 अशा 132 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचार्यांनी तातडीने रूजू होण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिले आहेत.