Sangli News : आघाडीचे मिशन फ त्ते; भाजप सत्तेबाहेर

नेते ‌‘दिलाने‌’ एकत्र राहिल्याचा फ ायदा ः ‌‘एकला चलो रे‌’च्या भूमिकेने भाजपचा ‌‘घात‌’
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

संजय खंबाळे

सांगली ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर सभापती निवडीतही बाजी मारत आघाडीने पुन्हा एकदा ताकद दाखवून दिली. ‌‘एकीचे बळ, चौघांचा मेळ‌’ ही म्हण सार्थ ठरवत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेच्या आघाडीने मिशन फत्ते करत भाजपला सत्तेबाहेर ठेवले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‌‘जोडीने चालले तरच वाट सुकर होते‌’ या तत्त्वावर सुरुवातीपासूनच भर दिला. ‌‘बचेंगे तो और भी लडेंगे‌’ या भूमिकेतून नेत्यांनी मतभेद अन्‌‍ मनभेद बाजूला ठेवत एकदिलाने लढत दिली. आमदार जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम आणि आमदार रोहित पाटील यांनी आपापले गड भक्कम ठेवत आघाडीचे दोर घट्ट केले. ‌‘मन एक तर पर्वतही हलतो‌’ याचा प्रत्यय या निवडणुकीत आला. आघाडीतील अंतर्गत वर्चस्वाच्या वादांना फाटा देत नेत्यांनी ‌‘जिथे कमी तिथे आम्ही‌’ अशी भूमिका घेतली. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही विश्वास निर्माण झाला. त्याचवेळी विरोधकांतील मतभेद आणि गटबाजीचा आघाडीने अचूक फायदा घेतला.

‌‘घरातला वाद शेजाऱ्याला पोसतो‌’ ही म्हण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या बाबतीत खरी ठरली. शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत साधलेला सूक्ष्म समन्वयही आघाडीच्या फायद्याचा ठरला. ‌‘नदी ओलांडताना दगड-दगड पकडावा लागतो‌’ या पद्धतीने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले. सत्तावाटपात समतोल राखत घटक पक्षांसह शिंदे-शिवसेनेलाही प्रतिनिधित्व देण्यात आले. दुसरीकडे भाजपने ‌‘एकला चलो रे‌’चा नारा देत स्वबळावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ‌‘एका हाताने टाळी वाजत नाही‌’ हे वास्तव या निवडणुकीत अधोरेखित झाले. स्थानिक पातळीवरील नाराजी, गटबाजी आणि समन्वयाचा अभाव यामुळे भाजपची गणिते कोलमडली. आघाडीचा हा विजय केवळ संख्याबळाचा नसून समन्वय, संयम आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे. भाजपसाठी मात्र हा निकाल ‌‘चुकांमधून शिकावे‌’ असा आत्मपरीक्षणाचा धडा देणारा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news