Sangli News : खातेवाटपात नाराजीनाट्य ः उपाध्यक्षांकडे शिक्षण, आरोग्य

सावित्री रवी-पाटील यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन, पृथ्वीराज पाटील यांना बांधकाम, अर्थची जबाबदारी
Sangli News
Sangli News
Published on
Updated on

सांगली ःजिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या खातेवाटपावरून शुक्रवारी चांगलेच राजकीय नाराजीनाट्य रंगले. उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना कृषी, पशुसंवर्धन खाते देण्यात येणार होते, अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसच्या नाराजीमुळे ऐनवेळी बदल करीत लाड यांना शिक्षण आणि आरोग्य खाते देण्यात आले. त्यामुळे सावित्री रवी-पाटील यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन, तर पृथ्वीराज पाटील यांच्याकडे बांधकाम, अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली.

जि. प.च्या वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षा संगीता पाटील यांनी विविध समित्यांच्या सभापतींना प्रभार सोपविला. मात्र त्याआधीच खातेवाटपावरून खलबतांना वेग आला होता. दुपारी दोन वाजता सुरू होणारी सभा तब्बल दीड तास उशिरा सुरू झाली.

काँग्रेसकडे 11 सदस्य संख्या असतानाही उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना कृषी, पशुसंवर्धन खाते दिले जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे ऐनवेळी बदल करत लाड यांच्याकडे शिक्षण व आरोग्य विभागाची सोपविण्यात आली. त्यामुळे सावित्री तम्मनगौडा रवी-पाटील यांच्याकडील शिक्षण-आरोग्य खाती बदलून त्यांना कृषी व पशुसंवर्धन विभाग देण्यात आले. खातेवाटपातील या अचानक बदलामुळे सावित्री रवी-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. काही काळ त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती निवळली आणि खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले.

निवडीनंतर नूतन पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news