Sangli crime: चोरोचीजवळ राज्यमार्गालगत तरुणाचा मृतदेह आढळला

खून की अपघात याबाबत संशय
Deadbody Found
Deadbody FoundPudhari
Published on
Updated on

नागज : विजापूर-गुहागर राज्यमार्गालगत कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावच्या हद्दीत डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. दत्तात्रय भगवान चाबरे (वय 45, रा. संजयनगर, सांगली) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा खून झाला की अपघात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी चोरोची गावच्या पूर्वेला निर्जनस्थळी विजापूर-गुहागर राज्यमार्गालगत रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात डोक्याचा चेंदामेंदा झालेला मृतदेह आढळून आला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावर रक्त सांडलेले दिसत होते. त्यांचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेऊन नाल्यात ढकलून दिला असावा असे प्रत्यक्षदर्शी चित्र होते. त्यांचा खून झाला की अपघात याबाबत संशय बळावला आहे. मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधार कार्डावरून त्याची ओळख पटली. खून झालेली व्यक्ती एका हाताने व्यंग असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासाहेब यमगर यांचे नागज फाट्यावरून अपहरण व खून करून त्यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील मदभावी येथील झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस हेड कॉन्स्टेबल पी. एस. स्वामी यांच्यासह पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे ताब्यात घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news