Sangli Crime : सांगलीत तरुणावर प्राणघातक हल्ला; पाच जणांवर गुन्हा

सांगली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime
CrimePudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून एका तरुणाला जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून नेऊन त्याच्यावर कोयता आणि चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरात घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अविनाश गणेश कुकडे (वय २४, रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) या तरुणाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश कुकडे हा आरटीओ ऑफिस परिसरात उभा असताना संशयित यश दत्तू लोंढे, ओम लोखंडे, आदित्य चव्हाण, आदित्य पाटोळे आणि गौरव लोंढे (सर्व रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) हे दुचाकीवरून तेथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून अविनाशला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.

त्यानंतर त्याला मिरज-पंढरपूर रस्त्यावरील डी-मार्टच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत नेण्यात आले. तेथे संशयितांनी चॉपर व कोयत्याने अविनाशच्या डोक्यावर, हाताच्या मनगटावर आणि कोपऱ्यावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सांगली शहर पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news