सांगली : चित्रपट पाहताना तरुणाचा आकस्मिक मृत्यू

आधार हरवल्याने वडील एकाकी : विश्रामबाग परिसरातील घटना
Sangli News
सांगली : चित्रपट पाहताना तरुणाचा आकस्मिक मृत्यूFile Photo
Published on
Updated on

सांगली : गेल्या दहा वर्षांपूर्वी आईच्या मायेचे छत्र हरपलं... एकुलत्या एक बहिणीचा विवाह झाल्याने ती देखील दक्षिणेतील राज्यात कायमची स्थायिक... त्यामुळे बाप-लेक दोघेच माधवनगरातील घरात रहायचे... घरात स्त्री नसल्याने दोघेही खानावळीतून डबा आणून खायचे... नेहमीप्रमाणे तो तरुण कामानिमित्त घरातून बाहेर पडला तो घरी पुन्हा कधीही न परतण्यासाठीच...

ऑफिसमधील काम आटोपून तो विश्रामबागमधील एका गेम पार्लरमध्ये गेला. तेथे लॅपटॉपवर चित्रपट पाहता पाहता तो चक्कर येऊन खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. एकुलता एक आधार असणार्‍या मुलाचे निधन झाल्याने आता जगायचेच कशासाठी हा प्रश्न घेऊन रुग्णालयात बसलेले त्याचे वडील, ही सुन्न करणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सचिन मारुती जाधव (वय 34, रा. कॉटनमिलजवळ, माधवनगर) असे त्याचे नाव आहे. सचिन नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडला. त्यानंतर सायंकाळी विश्रामबाग परिसरातील एका गेम पार्लर येथे तो बसला होता. त्याच्यासोबत काही मित्र देखील होते. गप्पाटप्पा सुरू होत्या, तसेच तो यावेळी लॅपटॉपवर चित्रपटदेखील पाहात होता. तेवढ्यात त्याला चक्कर आली. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

बायकोही गेली, मुलगाही गेला...

सचिन याचे वडील मारुती जाधव हा निवृत्त आहेत. मुलगा सचिन हा एका फायनान्स कंपनीत काम करीत होता. पत्नीचे दीर्घ आजाराने दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे आणि ती तमिळनाडू येथे सासरी गेली. सचिन आणि त्याचे वडील मारुती दोघेच घरात रहायचे. वडिलांना सचिनचाच आधार होता. सकाळ-सायंकाळ ते खानावळीतील जेवण करायचे. एकमेव असणारा सचिनचा आधारही गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news