Sangli News : यड्राव खूनप्रकरणी दोघांना अटक

शहापूर गुन्हे शोधपथकाची कारवाई
Sangli News
यड्राव खूनप्रकरणी दोघांना अटक
Published on: 
Updated on: 

यड्राव : येथील हॉटेल अ‍ॅकॉर्ड इंटरनॅशनलमधील व्यवस्थापकाच्या खूनप्रकरणी दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शहापूर गुन्हे शोधपथकाने अटक केली. गंगा प्रवीण पाटील (वय २१, रा. यड्राव, ता. शिरोळ) आणि अशपाक सिकंदर नदाफ (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

अल्बर्ट हेरीबेन्नी अंब्रोस (वय ५३, मूळ रा. समतानगर मिरज, सध्या रा. गावठाण यड्राव) हा हॉटेल व्यवस्थापक होता. शनिवारी रात्री संशयित दोघेजण दारू पिण्यासाठी आले. यावेळी हॉटेलच्या बाहेर त्यांचा एका महिलेशी वाद झाला. त्यावेळी अल्बर्ट हा संशयितांना समजावण्यासाठी गेला असता त्यांच्यात वाद वाढून अल्बर्ट यास मारहाण केली. त्यात अल्बर्टचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयितांनी तिथून पलायन केले होते. पो.कॉ. रोहित डावाळे यांना गोपनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार संशयितांना जयसिंगपूर अंकली टोलनाका येथून ताब्यात घेण्यात आले. दोघेही रेकार्डवरील गुन्हेगार आहेत.अल्बर्टच्या मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर तो पत्नी व भावाच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर मिरज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबतची फिर्याद हॉटेल मालक प्रसाद शुभन्ना शेट्टी (वय ५८, रा. पुजारी मळा, इचलकरंजी) यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news