Sikandar Sheikh Accident: विठ्ठलवाडीजवळ अपघातात पैलवान सिकंदर शेख किरकोळ जखमी

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख यांच्या मोटारीस भीषण अपघात झाला
Sikandar Sheikh Acciden
Sikandar Sheikh Acciden
Published on
Updated on

नागज : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख यांच्या मोटारीस भीषण अपघात झाला. मोटार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. यात सिकंदर शेख हे किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली.

विठ्ठलवाडी गावाजवळ महामार्गाचे काम सुरू असून, सुरक्षेच्या दृष्टीने तिथे प्लास्टिकचे बॅरेल ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी या महामार्गावरून निघालेली सिकंदर शेख यांची मोटार नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकावर आदळली. अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातात सिकंदर शेख किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. घटनेची नोंद उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलिसात नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news