Sangli Crime : साक्षीदाराच्या हत्येसाठी सुपारी देणारी महिला अटकेत

कोसारी दुहेरी खून प्रकरण
Kosari Double Murder Case
दादासाहेब यमगर खून
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कोसारी दुहेरी खून खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दादासाहेब यमगर यांच्या अपहरण व निर्घृण खून प्रकरणात संशयितांना सुपारी देणाऱ्या पद्मिनी बापू मदने (रा. कापसे प्लॉट, सांगली) हिला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, कोसारी दुहेरी खून खटल्यातील मुख्य संशयित अनिल यमगर सध्या कारागृहात आहे. त्याची आत्या पद्मिनी मदने ही त्याला भेटण्यासाठी कारागृहात जात असे. त्यावेळी अनिल यमगरने पद्मिनीला ज्ञानू खोत याला आवश्यक ती सर्व मदत कर, असे सांगितले होते.

अनिल यमगरच्या सूचनेनुसार, पद्मिनी मदने हिने ज्ञानू खोत याला 20 हजार रुपये दिले होते. याचबरोबर न्यायालय परिसरात दादासाहेब यमगर यांची ओळख पटवून दिली. संशयितांनी दादासाहेब यमगर यांचे अपहरण करून अथणी तालुक्यात नेले. तिथे त्यांचा खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news