Sangli Well Tragedy : विहिरीत पडून जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

हंगिरगे येथील घटना; तपास जत पोलिसांकडे वर्ग
falling in well |
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

जत : हंगिरगे (ता. सांगोला) येथे शेतातील विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदाशिव तुकाराम बिराजदार (वय 65, मूळ रा. सांगली, सध्या रा. हंगिरगे) असे मृताचे नाव आहे. या घटनेची प्राथमिक नोंद सांगोला पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपासासाठी कागदपत्रे जत पोलिस ठाण्यात वर्ग झाली आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव बिराजदार हे 14 मे रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हंगिरगे येथील सोमनाथ कदम यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने गंभीर जखमी झाले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच 15 मे रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर सांगोला पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून प्राथमिक नोंद करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news