Miraj Accident |भोसे गावात वाहनाखाली चिरडून वारकरी ठार

सैनिक टाकळीतील वारकर्‍यावर काळाचा घाला; मध्यरात्री महामार्ग ओलांडताना झाला अपघात
Miraj Accident News
Miraj Accident News
Published on: 
Updated on: 

मिरज : भोसे (ता. मिरज) येथे मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना भरधाव वाहनाखाली चिरडल्याने वारकरी जागीच ठार झाला. उत्तम बाबासाहेब पाटील (वय ५४, रा. सैनिक टाकळी, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.

वारकरी उत्तम पाटील हे सैनिक टाकळी येथून पंढपूर येथे कार्तिक वारीसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत अन्य ४० वारकरी होते. वारकर्‍यांचा संघ विश्रांतीसाठी भोसे येथे शनिवारी रात्री थांबला होता. रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उत्तम पाटील हे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून दुसर्‍या बाजूला निघाले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाने त्यांना चिरडले. वाहनाखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रविवारी सकाळी सर्व वारकारी उठल्यानंतर त्यांना उत्तम पाटील संघात मिळून आले नाहीत. महामार्गाच्या दुसर्‍या बाजूला उत्तम पाटील यांचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, उत्तम पाटील हे मध्यरात्री महामार्ग ओलांडून कशासाठी निघाले होते हे मात्र समजू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.