Hutatma Factory Protest : 15 गावांतील सभासद, शेतकऱ्यांचा उद्या निर्णय

गौरव नायकवडींचा इशारा; आंदोलनाचा 30 वा दिवस
Hutatma Sugar Factory Protest
Hutatma Sugar Factory Protest
Published on
Updated on

वाळवा : हुतात्मा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील 15 गावांतील सभासद व शेतकरी उद्या आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत निर्णय घेतील, असा इशारा गौरव नायकवडी यांनी वाळवा येथे दिला.

अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी कारखान्यावर केलेले कर्ज भागवून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी किरण नायकवडी, गौरव नायकवडी व केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा काल 30 वा दिवस होता. यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले, हुतात्मा साखर कारखाना हा सर्व शेतकरी सभासदांचा आहे, हे वैभवकाका विसरले आहेत. त्यांनी कारखाना स्वतःच्या मालकीचा करण्याचा प्रयत्न केला. कारखान्याची अक्षरशः लूट करण्यात आली असून भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे दररोज समोर येत आहेत.

ते पुढे म्हणाले की, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि संचालक आगामी गळीत हंगामाच्या तयारीत व्यस्त असून हा हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किरण नायकवडी हे बीड येथे ऊसतोडणी मजूर व वाहतूकदार यांच्याशी करार करण्यासाठी गेले असून संबंधितांना करारापोटी 26 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

बजरंग पाटील, आनंदराव कोरे (नागठाणे), अशोक खोत (पडवळवाडी), दादा चव्हाण (नवेखेड), प्रकाश पाटील (नगराळे), डॉ. इकबाल मेवेकरी, बाळासाहेब यादव (अहिरवाडी) यांनी मनोगते व्यक्त केली. आंदोलनस्थळी ॲड. वरुण माने, केदार नायकवडी, बाळासाहेब पाटील, पोपट अहिर, सरपंच संदेश कांबळे, अरुण यादव, उमेश घोरपडे, राजेंद्र मुळीक, मानाजी सापकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news