Sangli Property Fraud: वळसंगमधील जमीन व्यवहारातील मृत व्यक्ती जिवंत

खोटे घोषणापत्र करून दस्त नोंद, फसवणुकीचा गुन्हा
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

जत : वळसंग (ता. जत) येथील जमीन खरेदी दस्ताच्या घोषणापत्रामध्ये मयत व्यक्ती जिवंत असल्याचा खोटा उल्लेख करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मीरासाहेब देवदास ढाले (रा. मिरज नदीवेस, बौद्ध कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून कुंतल तरुण बासु (वय ४५, रा. फरिदाबाद, हरियाणा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १३ मार्च २०२५ रोजी जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आरआरबी एनर्जी कंपनीच्या नावावरील वळसंग येथील जमीन गट क्रमांक ६९२ व ६९३, दस्त क्रमांक १५९६/२०२५, १५९७/२०२५ व १५९८/२०२५ द्वारे विविध व्यक्तींच्या नावे खरेदीखत नोंदविण्यात आले होते. मात्र, या जमिनीचे मूळ मालक श्रीकांत तुकाराम साळे (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांनी या खरेदीखताच्या घोषणापत्राबाबत आक्षेप घेत तक्रार दाखल केली.

जमीन खरेदीच्या घोषणापत्रात वारसांपैकी कोणतीही व्यक्ती मयत नसल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्यक्षात वारसांमधील एक व्यक्ती मयत असूनही ती जिवंत असल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जत पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news