Sangli Bribery Case : लाचप्रकरणी वाकुर्डे खुर्दच्या सरपंचाचा खुलासा सादर

अपात्रतेचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे
bribery case
bribery casepudhari photo
Published on
Updated on

सांगली ः शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द येथील लाच प्रकरणातील सरपंचावर अपात्रतेची कार्यवाही जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. प्रशासनाच्या नोटिसीवर सरपंच शीतल पाटील यांनी म्हणणे सादर केले आहे. झेडपीचे प्रशासन आता आयुक्तांकडे अहवाल सादर करणार आहे.

सरपंच पाटील व त्यांचे शिक्षक पती बाळासाहेब पाटील यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहा एप्रिलरोजी पकडले होते. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब पाटील हे जाधववाडी (माधळगाव) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यांच्यावरील कारवाईसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेने त्यांना निलंबित केले. त्यानंतर पुढील टप्प्यात आता त्यांच्या पत्नी सरपंच पाटील यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेने त्यांना लाचप्रकरणी अपात्र का करू नये? या आशयाची नोटीस दिली होती. त्यावर खुलासा सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर सरपंच पाटील यांनी दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, मला सक्षम न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. त्यामुळे अपात्रतेची कारवाई करू नये.

प्रशासनाने सांगितले की, सरपंच पाटील यांचा खुलासा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारवाईचा अहवाल, तसेच पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईची कागदपत्रे विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येतील. तेथील सूचनेनुसार सरपंच पाटील यांच्या खुलाशावर सुनावणी होईल. त्याचाही अहवाल पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या अपात्रतेसंदर्भातील कारवाईचा अंतिम निर्णय आयुक्त स्तरावर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news