Sangli Crime : विट्यात डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून

पूर्ववैमनस्यातून घटना; संशयितास अटक
Sangli Crime News
विट्यात डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून
Published on: 
Updated on: 

विटा : विट्यात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाच्या डोक्यात फरशी घालून एकाचा खून करण्यात आला. इम्तियाज शमशुद्दीन अन्सारी (वय ५२, सध्या रा. दत्तनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली; मूळ रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सचिन नंदकुमार भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलिसांनी संशयित विजय शंकर चव्हाण (वय ३१, रा. मेटकरी वस्ती, विटा) याला अटक केली आहे. ही घटना सोमवार, दि. १९ ऑक्टोबररोजी सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भागवत यांच्या मालकीच्या खोलीमध्ये इम्तियाज अन्सारी भाड्याने राहत होते. ते दत्तनगर येथील एका यंत्रमागावर काम करत होते. पूर्ववैमनस्य व जुन्या भांडणाचा राग धरून विजय चव्हाण याने सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास यंत्रमागाच्या खोलीतच अन्सारी यांच्या डोक्यात फरशी घालून खून केला.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश साळुंखे व उपनिरीक्षक संग्राम पाटील यांच्या पथकाने वेगाने तपास चक्रे हलवली. यादरम्यान, हवालदार अमोल पाटील व महेश देशमुख यांना संशयित विजय चव्हाण हा लेंगरे रस्त्यावरील भांबर्डे टेक येथे फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या आधारे विटा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान विजय चव्हाण याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला मंगळवार, २१ रोजी दुपारी अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला बुधवार, दि. २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news