

विटा: पुढारी वृत्तसेवा: राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मात्र, मुख्यमंत्री स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी दिल्ली वाऱ्या करीत आहेत, अशी टीका सांगली जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने 'होऊ दे चर्चा' या अभियानाची सुरुवात खानापूर मतदारसंघातील विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, विधानसभा संघटक गौरीशंकर भोसले, सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख अजित खंदारे, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाप्रमुख सादिक काजी, तालुकाप्रमुख दादासाहेब भगत, राज लोखंडे आदी उपस्थित होते.
संजय विभूते म्हणाले की, राज्यात सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती भयंकर आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा औषधांअभावी मृत्यू होत आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलीस ठाण्यातील आरोपी मोकाट सोडले जात आहेत. जे काम उध्दव ठाकरे यांनी घरात बसून केले, ते राज्यातील खोके सरकारला फिरून देखील जमत नाही. अजित पवार यांना बरोबर घेतल्याने मुख्यमंत्री शिंदे सैरभैर झाले आहेत. त्यांचे केवळ स्वतः ची खुर्ची वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी उपतालुकाप्रमुख सचिन अडसूळ, खंडेराव जाधव, बापूराव साळुंखे, रंगराव कुंभार, संभाजी निकम, सुशील केंगार, कृष्णात जाधव टेलर, स्वप्नील शेंडगे, आदित्य झेंडे, सचिन पोद्दार, अरविंद जगदाळे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा