

Vita municipal election
विटा : विटा नगरपरिषदेच्या सदस्य पदांसाठीच्या आरक्षण सोडतीत ११ जागा एससी (अनुसूचित जाती) , एसटी (अनुसूचित जमाती) आणि ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) उमेदवारांसाठी आरक्षित तर १५ जागांवर सर्वसाधारण उमेदवार निश्चित करण्यात आले. या पालिकेच्या एकूण २६ सदस्य संख्यांपैकी १३ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग) असे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. सोडतीवर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना घेण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आज (दि.८) सकाळी ११ वाजता पालिकेच्या अल्पबचत सभागृहात आरक्षण सोडत झाली. यात एस सी महिला (अनुसूचित जाती), एस टी महिला (अनुसूचित जमाती), ओबीसी महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
विशेष म्हणजे एकूण २६ जागांपैकी १३ जागी महिला आरक्षण आहे. यात १३ पैकी १ जागा कायमच महिला राखीव असेल, यात फक्त ओबीसी किंवा एससी हे सोडतीत ठरले. विटा पालिकेच्या नव्या सुधारित प्रभाग रचनेत एक प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढला आहे. त्यामुळे जनतेतून नगराध्यक्षपद तर प्रत्येकी २ अशा एकूण १३ प्रभागांतून एकूण २७ सदस्य निवडले जाणार आहेत. यावेळी विटा पालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यातच लढत होण्याची सध्या तरी चिन्हे आहेत.
विटा पालिका हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या ४८ हजार २८९ आहे. त्यानुसार १३ प्रभागातून २६ नगरसेवक संख्या राहणार आहे. विट्यात अनुसुचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या ६ हजार ६२८ आहे. तर अनुसुचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या ४०२ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणा त अनुसुचित जाती प्रवर्गाचे ४ नगरसेवक असणार आहेत. यापैकी २ महिला आहेत. एकूण २६ पैकी ७ नगरसेवक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असतील. यापैकी ४ महिला असणार आहेत. तर एकूण १३ महिला नगरसेविका असतील.
तर सर्वसाधारण प्रवर्गातील ८ नगरसेवक असणार आहेत. एका प्रभागाची लोकसंख्या साधारणपणे ३ हजार ७१५ राहणार आहे. दरम्यान, ५० टक्के महिला आरक्षणामुळे एकूण २६ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक १
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक २
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
सर्वसाधारण (महिला),
सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५
अनुसूचित जाती
सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ६
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७
नागरिकांचा मागास प्रवर्ग,
सर्वसाधारण (महिला),
प्रभाग क्रमांक ८
नागरिकांचा मागास प्रवर्ग,
सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ९
अनुसूचित जाती (महिला)
सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ११
अनुसूचित जाती (महिला)
सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२
नागरिकांचा मागास प्रवर्ग,
सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक १३
अनुसूचित जाती,
सर्वसाधारण (महिला)