

विटा : विटा बाजार समितीला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचना द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार बाजार समितीची दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, विटा बाजार समिती अशी सभा होत नाही. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी विट्याच्या सहाय्यक निबंधकांकडे निवेदन दिले.
याबाबत ॲड. मुळीक म्हणाले की, मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत ज्या तालुक्यात बाजार समित्या नाहीत, अशा ६५ तालुक्यात नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात विटा बाजार समितीचे विभाजन करून विटा आणि कडेगाव अशा दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याच्या आहेत. याबाबत सहाय्यक निबंधक आणि विटा बाजार समितीने प्रस्ताव करावा तसेच नियम बाह्य कंत्राटी कर्मचारी नेमणूक, विकास आराखडा डावलून केलेले प्लॉट वाटप, चुकीची भाडे आकारणी, बाजार आवारात सुविधांची वानवा या सर्व बाबींची सहाय्यक निबंधक कार्यालया मार्फत चौकशी करून याबाबत कार्यवाही करा, अशी मागणी केली आहे.
यावर योग्य ती कायदे शीर कारवाई करतो, असे आश्वासन सहाय्यक निबंधक सुधीर कांबळे यांनी दिले. यावेळी गजानन सुतार, महेश कुपाडे, किसन राव जानकर, किशोर लांब, रावसाहेब पाटील, महादेव जाधव आदी उपस्थित होते.