सांगली : विट्यात अंमली पदार्थाच्या बाटल्यांची विक्री; दोघांना अटक

Sangli Crime : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Sangli Crime News
विट्यातअंमली पदार्थाच्या ३५ बाटल्यांची विक्री करताना पोलिसांनी दोघांना अटक केली.
Published on
Updated on

विटा : विट्यात मेफेनटरमाइन सल्फेट या अंमली पदार्थाच्या ३५ सीलबंद बाटल्यांची विक्री करताना सोमवारी (दि.२४) पोलिसांनी दोघांना अटक केली. ओंकार धनराज पवार (वय २८) आणि बादल अब्दुल पिरजादे (वय ३२,दोघेही रा.विटा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार महेश देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रीतु खोकर तसेच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ, नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विरोधी कारवाई करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी आपल्या गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानंतर याबाबत तपास सुरू असताना विट्यात एकजण अमली पदार्थाची विक्री करण्यास आला असल्याची माहिती पथकातील पोलीस हवालदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना सुत्रांकडून मिळाली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक फडतरे हे आपल्या पथकासह विट्यात गस्त घालत असताना कराड रस्त्यावरील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ एकजण एका विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवर बसलेला त्यांना दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने ओंकार पवार असे आपले नाव असून विवेकानंदनगर विटा येथे राहत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंमली पदार्थाच्या मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन आय पी (MEPHENTERMINE SULPHLATE INJECTION IP) असे लिहिलेल्या एकूण ३५ सिलबंद बाटल्या आढळल्या. त्याने या बाटल्या विटातीलच कराड रस्त्यालगतच्या बर्वे मळा परिसरात राहणाऱ्या बादल पिरजादेकडून घेतल्या असून त्या ज्यादा दराने विक्रीसाठी आणल्या असल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, विटा शहर आणि परिसरात कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर पिळदार बनविण्याच्या नावाखाली हे घातक अंमली पदार्थाच्या इंजेक्शनचा वापर करत असल्याची माहिती समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. अशा तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या अमली पदार्थाच्या बाटल्या कोठून खरेदी केल्या. याचा मुळापर्यंत सखोल तपास सुरू आहे, असेही पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक जयश्री कांबळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news