कडेगाव शहर : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले. हे अधिवेशन अनेक कारणांनी गाजले. सत्ताधारी व विरोधकांनी अनेक मुद्द्यांवर एकमेकांवर आक्रमक झाले. तर राज्याच्या इतिहासात जे घडले नाही तेही या अधिवेशनात शिवीगाळ, हमरीतुमरी आणि मारामारी च्या माध्यमातून घडून आले. मात्र आपला सुसंकृत आणि विनम्रपण दाखवत व योग्यवेळी विकासाच्या मुद्द्यांवर आक्रमक शैलीत भाष्य करीत आपल्या मतदारसंघाचे आणि जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याचा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी प्रयत्न केला.
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही आपल्या कार्यकाळात अनेक अधिवेशने गाजवली होती. मात्र ती विनम्र आणि आपल्या सडेतोड बोलण्याने जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यावर तोडगा आणि निधी मिळवित पलूस कडेगाव मतदारसंघ आणि पर्यायाने जिल्हा व राज्याच्या विकासात बहुमोल योगदान दिले.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आमदार डॉ. विश्वजित कदम आमदार झाल्यापासून विधानसभेत काम करीत आहेत. नुकतीच झालेली अधिवेशन हे अनेक कारणांनी गाजले. त्यात मारामारी सारखे प्रकार देखील पुढे आले. मतदारसंघाच्या आणि राज्यातील शेतकरी, मजूर, गोरगरीब जनतेचे प्रश्न विधानसभेत कशा प्रकारे मांडायचे आणि त्यावर तोडगा कसा काढायचा याकडे अधिक लक्ष देत डॉ. कदम यांनी काम केले. याचबरोबर पलूस नगरपालिका, कडेगाव नगरपंचायत इमारतीसाठी निधी, याचसोबत विकास कामासाठी निधीची मागणी त्यांनी यावेळी केली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी अधिवेशनात केले.
सांगली जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेची रखडलेली कामे पूर्ण व्हावीत. प वसगडे (ता. पलूस) येथील शेतकर्यांच्या भुईभाड्याचा लवकर मार्गी लावावा. प कडेगाव नगरपंचायत व पलूस नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठीचा निधी मिळावा. प सफाई कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी तसेच नुकंपावर पदभरतीसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. प सावंतपूर गावामध्ये 15 ते 17 शेळ्यांवर बबट्याने हल्ला केला. याकडे विशेष लक्ष द्यावे. प जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्व्हर डाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक प राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला. प सांगलीतील ड्रेनेज योजना पूर्ण व्हावी. प सायबर गुन्हेगारीवर आळा बसवावा. प पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था. प अमली पदार्थ, ड्रग्ज याचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साठे सापडत आहेत. यावर आळा घालावा.