Sangli Crime : वेदांत बंडगर खुनातील आणखी एका फरारीस अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
Vedant bandgar murder case
Vedant bandgar murder case
Published on: 
Updated on: 

सांगली : हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर (वय १४) याच्या खून प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फरारी असलेल्या विशाल बिरूदेव चौगुले (वय ३०, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

रेल्वे मालधक्क्यावरील कामाच्या वर्चस्वावरून गुंड नीलेश गडदे आणि लक्ष्मण खरात यांच्यात वाद झाला होता. याच वादातून जत पोलिस ठाण्यासमोर दोन्ही गट आमनेसामने येऊन गडदे याच्या गाडीवर दगडफेक झाली होती. या घटनेला बाळासाहेब बंडगरच कारणीभूत असल्याचा संशय धरून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गडदे साथीदारांसह ११ जून रोजी सांगलीत आला होता. मात्र, बंडगर घरात नसल्याचे पाहून संतापलेल्या संशयितांनी अंगणात खेळत असलेला त्यांचा १४ वर्षांचा नातू वेदांत याच्यावर गोळी झाडून त्याचा निर्घृण खून केला. या प्रकरणी पोलिसांनी गडदे टोळीला तत्काळ अटक केली होती, मात्र विशाल चौगुले हा घटनेनंतर फरार झाला होता.

दरम्यान, संशयित विशाल चौगुले हा खंडेराजुरी ते गुंडेवाडी रस्त्यावर थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली. पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत केलेल्या चौकशीत त्याने वेदांत बंडगरच्या खुनात थेट सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी संजयनगर पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news