Sangli : वाळवा येथील डॉक्टरची 14 लाखांची फसवणूक

ऑनलाईन शेअर मार्केटमधून आमिष
Sangli Crime News
वाळवा येथील डॉक्टरची 14 लाखांची फसवणूक (File Photo)
Published on
Updated on

आष्टा : ऑनलाईन शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी वाळवा येथील एका डॉक्टरची तब्बल 14 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अनिल चंद्रकांत खुंटाळे (वय 52, रा. वाळवा) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. खुंटाळे यांनी मोबाईलवर आलेल्या लिंक व संदेशांच्या आधारे अ‍ॅडव्हेंट स्टॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. शेअर मार्केट ग्रुपचे अ‍ॅडमीन अक्षय अल्लादि नावाने व असिस्टंट पायल शर्मा नावाने व्हॉटस् अ‍ॅप मेसेज करून अ‍ॅडव्हेंट स्टॉक बुकिंग प्रायव्हेट लिमिटेड अडेटटॉप नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवून काही परतावा दाखवल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर संशयितांनी डॉ. खुंटाळे यांना वारंवार कॉल, व्हॉटस् अ‍ॅप व मेसेज करून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. एकूण 14 लाख 30 हजार रुपये विविध खात्यांमध्ये भरल्यानंतर डॉ. खुंटाळे यांना नफा मिळाला नाही. उलट या कंपनीने आपला संपर्क क्रमांक व वेबसाईट बंद केल्याने, आपली फसवणूक केल्याचे डॉ. खुंटाळे यांच्या लक्षात आले. संशयितांनी दिलेल्या लिंक, खोटी कस्टमर केअर सेवा व खोट्या ब्रोकिंग आयडीचा वापर करून दि. 9 मे 2024 ते 14 जून 2024 या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित संशयितांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news