Sangli news : वायफळेत दोन ग्रा.पं. सदस्यांचा राजीनामा

सुखदेव पाटील गटाला धक्का; उपसरपंच पदाचा वाद चिघळला
Sangli news
वायफळेत दोन ग्रा.पं. सदस्यांचा राजीनामा
Published on
Updated on

तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायतीत सुखदेव पाटील गटात उपसरपंच पदावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आहे. अडीच वर्षानंतर उपसरपंच बदलण्याचा शब्द देऊनही तो पाळला जात नसल्याने सदस्यांमध्ये नाराजी आहे. यातूनच सुखदेव पाटील गटाच्या पूनम प्रकाश फाळके व अंकुश बापू फाळके या दोन सदस्यांनी सोमवारी सरपंच संतोष नलवडे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे सुखदेव पाटील गटाला धक्का बसला आहे.

तीन वर्षांपूर्वी वायफळे ग्रामपंचायतीची निवडणूक आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील गटामध्ये झाली होती. थेट सरपंच निवडणुकीत सुखदेव पाटील यांचा पराभव करून संतोष नलवडे हे सरपंच झाले. सदस्यांमध्ये आमदार गटाचे 6 व माजी खासदार गटाचे 7 सदस्य निवडून आले. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू होताच निवडीच्या एक दिवस अगोदर आमदार गटाकडून निवडून आलेल्या पूनम फाळके या नॉट रिचेबल झाल्या. त्या थेट उपसरपंच निवडीदिवशी ग्रामपंचायतीमध्ये हजर झाल्या. त्यांनी उपसरपंच निवडीवेळी सुखदेव पाटील गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे या गटाकडे आठ सदस्य झाले, तर आमदार गटाकडे केवळ पाच सदस्य उरले. त्यामुळे पंकज पाटील हे सुखदेव पाटील गटाकडून उपसरपंच झाले. परिणामी ग्रामपंचायतीवर सत्ता आमदार गटाची असली तरी मताधिक्य माजी खासदार गटाचे अधिक होते.

आमदार गटाकडून निवडून आल्यानंतरही माजी खासदार गटाला उपसरपंच निवडीवेळी पाठिंबा दिल्याने अडीच वर्षानंतर पूनम फाळके यांना उपसरपंच करण्याचा शब्द सुखदेव पाटील यांनी दिला होता. मात्र ग्रामपंचायतीची तीन वर्षे झाली तरी हा शब्द पाळला गेला नाही. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून पूनम फाळके या दिलेला शब्द पाळावा, यासाठी सुखदेव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र टोलवाटोलवी केली जात असल्याने गेल्या काही महिन्यांपासून पूनम फाळके या नाराज होत्या. त्यातूनच त्यांनी आज सरपंच नलवडे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यांना पाठिंबा म्हणून सदस्य अंकुश फाळके यांनीही राजीनामा दिला आहे.त्यामुळे सुखदेव पाटील गट अल्पमतात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news